Me Sahyadri September 2016 b

/ Sahyadri Geographic by Vivek Kale
 

 
 


 

Me Sahyadri
September 2016
Volume 3, number 14
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to all those who helped me during the compilation and for the help and guidance during the activity. The audio is representative of frog species. Please keep audio volume low.
 
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
As the economic development has taken the center stage, the balance between the environmental sustenance and socio economic development will be under the scanner. As most experts with balanced views have proclaimed, Indian wildlife and ecological system sustenance will be under threat, unless precautions are taken with the help of appropriate research and long term national interests. As we encounter the economic development, many habitats which indirectly or directly help sustainable development will be damaged. The awareness to gauge the success by sustainable development and not by year to year growth is a distant dream any environmentalist will assume in current scenario.
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and man made monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be left untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal, Me Sahyadri Magazine. The current issue has few of the amphibians from the north Western Ghats.
 

 

““
 
Me Sahyadri – September 2016 (b)
 
बेडकांबद्दल महत्वाच्या १० बाबी, १) बेडुक पाण्याजवळ किंवा पाण्यात रहातात. ते प्रदुषणाचे निर्देशक आहेत. जलप्रदुषणामुळे बेडुकांची संख्या कमी होते आहे. शेतात वापरल्या जाणाऱ्या किटकनाशकांमुळे व इतर रसायनांमुळे जलप्रदुषण होते. २) बेडकांचे लहान अधिवास मोठया जंगलाच्या अधिवासाचे लहान भाग असतात. झाडे, तलाव, डबकी, झुडुपे, झरे व ओढे, दगड धोंडे असे विविध अधिवास विविध बेडकांना आश्रय देतात. या सर्व घटकांचे संवर्धन म्हणजेच बेडकांचे संवर्धन होय. ३) पश्चिम घाटात दिसणारे बहुतांश बेडुक अंतर्जन्य आहेत. त्यांचा अधिवास पश्चिम घाटापुरता मर्यादीत आहे. पश्चिम घाटाचे संवर्धन म्हणजे त्यांचे संवर्धन होय. ४) जलप्रदुषण, शेतकी प्रगती, बुरशी रोगराई, अधिवासाचा विनाश अशा कारणांमुळे बेडुक कमी होत आहेत. ५)बेडुक हा खाद्यश्रुंखलेतला महत्वाचा घटक आहे. लहान किडे, डास यांना खाद्य करुन तो त्यांच्या संख्येवत नियंत्रण ठेवतो. ६) बेडुक पावसाळ्या व्यतिरिक्त काळात सुप्त (हायबरनेट) होतात. ७) बेडुक पावसाळ्यात अंडी टाकतात. ८) सह्याद्रीत आढळणाऱ्या बेडकांमध्ये बरेच बेडुक संकटात आहेत. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणाप्रमाणे या बेडकांना वाचवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. ९) वाघ, सिंहांवर जेवढे पैसे खर्च केले जात आहेत, त्यामानाने बेडकासारख्या लहान पण तितक्याच मह्त्वाच्या प्राण्यांकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत. १०) पश्चिम घाटात सध्या काही नविन बेडकांचे शोध लागले आहेत. बऱ्याच जातींवर संशोधन चालु आहे.
10 important aspects about frog are 1) Frogs are indicators of water pollution. The population of frogs is reducing due to water pollution. Water pollution takes place due to use of pesticides and other chemicals. 2) Frogs live in microhabitats within the larger forest habitat. These microhabitats can be streams, rocks, trees, bush, puddles, soil, low foliage. Conservation of every such element within the larger forest habitat is important. 3) Western ghats has many endemic species of frogs. Conservation of western ghats is important for survival of these species. 4) Water pollution, agricultural development, tourism, fungal infections, loss of habitat are the main reasons of reduction in numbers of frogs. 5) Frog is important part of food chain. They feed on insects, mosquitoes. 6) Frogs hibernate most of the time in year during non monsoon period. 7) Most of the frogs in western ghats breed in Monsoon. 8) Many species of frogs in western ghat appear as Threatened as per IUCN red list. The species are protected as per Indian Wildlife act. 9) Govt is spending funds on tigers and lions but not on frogs. 10) Many species of frogs in western ghats are being discovered. The research on the frogs is under progress by various research organizations.
 

 

““ 
The banner has been published here to improve the awareness of the trekkers and tourists visiting the various mountain forts, mountains in north western ghats. Please avoid accidents, by following good outdoor ethics such as no swimming in cisterns at mountain forts, no rock climbing without proper technical equipment and expertise. Please do not adventure, trek with any group or individually without understanding the risks associated. The frequency of the solo trekker fatalities have increased recently. Please strictly avoid solo treks. Please also avoid treks to mountains in large commercial groups, as it leads to damage to biodiversity of these high elevation ecological islands. Please respect the wildlife and biodiversity of the region. This has become more important as the ever increasing human interference is leading to severe damage to fragile ecosystems. Please be aware of the wildlife and biodiversity of the mountains before visiting these mountains. Please follow outdoor ethics. Follow ASI and Forest department rules. The concept of use of symbols for outdoor ethics was conceived and designed by "Sahyadri Trekker Bloggers Group".
 
 

 

 
1. Amboli toad, lateritic rocks and plateau, north western ghats, India
 
 

 

““
 
2. Amboli toad, lateritic rocks and plateau, north western ghats, India
 
 

 

““
 
3. Amboli toad, lateritic rocks and plateau, north western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, असे अनेक लहान अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये निक्टिबॅट्रचस जातीचे पाण्यांच्या प्रवाहाजवळ दगडावर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत. झॅन्तोफायरिन टायगरिनस असे सुंदर नाव असलेला हा बेडुक अंबोली टोड म्हणुन ओळखला जातो. या बेडकाचा शोध २००९ साली लागला आहे. त्यापुर्वी तो माहित होता, पण तो कोयना टोड आहे असा समज होता. २००९ नंतर ही वेगळी जात आहे हे स्पष्ट झाले. याच्या अंगावर वाघाच्या अंगावर असतात तसे पट्टे असतात. म्हणुन त्याला टायगरिना असे नाव पडले आहे. त्याच्या बोटांमध्ये पडदे नसतात. हे लहान आकाराचे बेडुक जांभ्या खडकांवर दिसतात. या बेडकाचे विश्व फक्त अंबोली या दक्षिण महाराष्ट्रातील गावापुरतेच आहे.
The western ghats in Amboli region in Maharashtra state has a wide array of microhabitats for the frogs. The streams, water puddles, lateritic rocks and plateaus and moist evergreen forest are few of the arrays of microhabitats in the region. Both rocky plateaus and evergreen forests in western ghats have seasonal water streams during the monsoon season. Xanthophryne tigerinus, Amboli toad was identified as a new frog species, recently in 2009.The species has distinct lateral stripes like in Tiger. Hence it is called as tigerinus. The strips are present on lateral and dorsal sides. The frog does not have webbing between fingers and toes.These small frogs are seen on the lateritic rocks in the forest clearings around Amboli.
 

 

““
 
4. Amboli toad, lateritic rocks and plateau, north western ghats, India
 
काही जांभ्याच्या खडकांवरच्या खोलगट भागात पावसाळ्यात लहान डबके साठते. बेडुक अश्या डबक्यांत अंडी टाकतात. दगडाच्या सारखेच बेडुक दिसत असल्याने ते त्यात बेमालुम होतात. तर लहान टॅडपोल्स सुद्धा पाण्याच्या डबक्यात रंगांमुळे बेमालुम होतात. पाय फुटल्यावर टॅडपोल्स डबके सोडतात.हे बेडुक फक्त अंबोली गावाच्या जवळ १० वर्ग कि मी भागात आढळतात. अंबोली गावाच्या आजुबाजुच्या मोकळ्या जागा, सडे, जांभे टिकले तर हे बेडुक रहातील. सर्वसामान्यांना निरुपयोगी वाटत असलेले जांभ्याचे खडक हे या बेडकाचे विश्व आहे. हे बेडुक फक्त अंबोली गावाच्या जवळ १० वर्ग कि मी भागात आढळतात. अंबोली गावाच्या आजुबाजुच्या मोकळ्या जागा, सडे, जांभे टिकले तर हे बेडुक रहातील. सर्वसामान्यांना निरुपयोगी वाटत असलेले जांभ्याचे खडक हे या बेडकाचे विश्व आहे. बेडकांची पिल्ले म्हणजे टॅडपोल्स हे जांभ्या खडकाच्या रंगाचे असतात. त्यामुळे त्यांचे परभक्ष्यांपासुन संरक्षण होते. हे बेडुक अत्यंत लहान भागात अस्तित्वात असल्याने आय यु सि एन संस्थेने त्यांना अत्यंत संवेदनशील अशा वर्गाच्या यादीत समाविष्ट केले आहे. अंबोली ला होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे या बेडकांना धोका निर्माण झाला आहे.
Some of the lateritic rocks have small grooves, which hold the rain water. Amboli toad lays its eggs in these shallow temporary water puddles formed in the lateritic rocks. The tadpoles are seen in the shallow rock puddles. The tadpoles at the later stage leave the puddles. These species are seen only around Amboli village in South Maharashtra. The conservation of habitat around Amboli is very important. The actual area ia about 10 square km. The rocks which form the habitat of this frog, otherwise look useless for common man are vital for its survival. The adult frogs are seen camouflaging with the rocks. Even the tadpoles are colored in such a way that they get camouflaged with the lateritic rock. As the frog is seen in very small area, it is listed as critically endangered as per IUCN red list. The number of this frog are reducing. Amboli is losing its forest gradually due to development, agricultural activites, logging and tourism.
 

 

““
 
5. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
 

 

““
 
6. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
.
.
 

 

““
 
7. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
 

 

““
 
8. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
 

 

““
 
9. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
 

 

““
 
10. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 

 

 

““
 
11. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
 

 

““
 
12. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
.
 

 

 
13. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
.
 

 

 
14. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
 

 

 
15. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
.
.
 

 

““
 
16. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण भागात, अंबोली च्या जवळ , बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत. या विविध बुश फ्रॉग्स मध्ये प्स्युडोफिलॅटस अंबोली नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. महाराष्ट्र (दक्षिण) राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ७५० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "क्रिटिकली एन्डेन्जर्ड" असा वर्ग देण्यात आला आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. नराला मानेजवळ एक फुगा असतो. सुर्यास्तानंतर तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
The western ghat in Amboli region in Sindhudurg district of Maharashtra haswide array of microhabitats for the frogs. Psuedophilatus frog genus is under grave threats, mainly due to the habitat degradation caused by the deforestation, agricultural practices and unplanned tourism. One of the bush frogs of the region is Psuedophilatus amboli, commonly known as Amboli bush frog. This frog is seen in evergreen shrubs and forest trees in moist semideciduous forests. It is endemic to western ghats, and is rated as critically endangered as per IUCN red list. The frog is seen mainly in north western ghats around Amboli village. The altitudinal range of this species is 700-800 meter above sea level. The front leg and hing leg digits have discs which help the frog to climb the bushes and small rocks. The front legs do not have any webs. Males have a median vocal sac. This species begins calling during or immediately after sunset.
 

 

““
 
17. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 

 

 

““
 
18. Pseudophilautus frog species, evergreen forest, north western ghats, India
 

 

 

““
 
Thank You
 
 
 
 
 


For any queries and suggestions contact at kale_v@rediffmail.com